प्रस्तावना

 

महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण विभागाच्या शैक्षणिक व प्रशासकीय सोयीसाठी राज्यस्तरावर
आयुक्त शिक्षण आयुक्तालय, शिक्षण संचालनालय, व विभाग स्तरावर विभागीय शिक्षण उपसंचालक
कार्यालयाची निर्मिती केलेली आहे. शिक्षण विभागाचे विभाग स्तरावरील विभाग प्रमुख हे शिक्षण
उपसंचालक आहेत. राज्यामध्ये ८ विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय आहेत. त्यात विभागीय
उपसंचालक, नागपूर विभाग नागपूर यांचे कार्यालय, बालभारती इमारत, दत्तप्रसाद, धंतोली बागेजवळ धंतोली नागवूर-१२ या ठिकाणी आहे. या विभागांतर्गत नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली हे सहा जिल्हे समाविष्ठ होतात. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालये व योजना शिक्षण स्तरावरील शैक्षणिक व प्रशासकीय बाबींसदर्भात विभागीय प्रमुख म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक हे काम पाहतात.

विभागीय कार्यालय, दुय्यम कार्यालये तसेच शिक्षण संस्था यांच्यात माहितीचे आदान प्रदान सुलभ व
वेगवान व्हावे, तसेच कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता व सुसूत्रता यावी यासाठी शासनाच्या माहिती
तंत्रज्ञान विषयक धोरणास अनुसरुन या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. याव्दारे मनुष्यबळ,
वेळ, सर्व शिक्षक पालक, विद्यार्थी याना तात्काळ महिती पुरविणे, आवश्यक ते मार्गदर्शन करणे व याव्दारे
त्यांचे जीवन सुकर करणे हे यांचे वैशिष्ठ आहे.

शिक्षण उपसंचालक, नागपूर विभागीय कार्यालय यांची दुय्यम कार्यालये, संलग्न शिक्षणसंस्था यांना
या संकेतस्थळावरुन माहितीचे थेट आदानप्रदान होत आहे. ही माहिती पाहण्यासाठी व प्रत उपलब्ध करुन
घेण्यासाठी या संकेतस्थळाला भेट द्यावी.


उल्हास नरड

शिक्षण उपसंचालक

नागपूर विभाग, नागपूर

कार्यालयीन परिपत्रके